मुंबई पालिकेच्या ऑनलाईन क्लासेसला राज्यातील विद्यार्थीही लावू शकतात हजेरी

कोरोनाच्या संकटामुळे शाळा-महाविद्यालये बंदच आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.  

Updated: Sep 19, 2020, 02:16 PM IST
मुंबई पालिकेच्या ऑनलाईन क्लासेसला राज्यातील विद्यार्थीही लावू शकतात हजेरी  title=
संग्रहित छाया

कृष्णात पाटील / मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे शाळा-महाविद्यालये बंदच आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. अनेक शाळांना ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे. मात्र, काहींना ऑनलाईन शिक्षण घेण्यास अडचण येत आहे. दरम्यान,  मुंबई महापालिकेने सुरु केलेल्या ऑनलाईन क्लासेसला आता राज्यातील विद्यार्थीही हजेरी लावू शकतात. पहिली ते दहावी इयत्तापर्यंतच्या सर्व विषयांना हजेरी लावता येईलच, शिवाय यूट्यूबवरही लेक्चर्स पाहता येतील. 

 मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये जूनपासून मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिकवले जात आहे. पण आता राज्य सरकारच्या विनंतीनुसार पालिकेने पूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यमातील मुलांसाठी हे ई क्लास सुरू करण्यात आलेत. त्यासाठी ३९६ शिक्षकांची निवड केली आहे, अशी माहिती पालिकेचे  शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी माहिती दिली.

 ऑनलाईन क्लासला हजेरी लावण्यासाठी मुंबई महापालिकेच्या https://portal.mcgm.gov.in , portal.mcgm.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल. ऑनलाईन शक्य नसल्यास यू ट्यूबवर  Bmc EduMarathi/Hindi/English/urdu  या आपल्या भाषेनुसार चॅनेलवर जावून हवी असलेली लेक्चर्स पाहता येतील , अशी माहिती शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली.

 कोरोना संकटामुळं राज्यात शाळा बंद आहेत. परंतु सर्वत्रच ऑनलाईन शाळा सुरू नाहीत. यामुळे मुंबई महापालिकेचा हा उपक्रम सर्वच विद्यार्थ्यांसाठी लाभदायक आहे.