फोटो राघव परिणीतिचा पण चर्चा आदित्य ठाकरेंच्या लग्नाची! सोशल मीडियावर कॉमेंटचा पाऊस

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर राघव चड्ढा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांच्या लग्नाचे फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी केला त्यांच्याच लग्नाचा सवाल... सोशल मीडियावर कमेंटचा वर्षाव.

प्रतिक्षा बनसोडे | Updated: Sep 27, 2023, 07:38 PM IST
फोटो राघव परिणीतिचा पण चर्चा आदित्य ठाकरेंच्या लग्नाची! सोशल मीडियावर कॉमेंटचा पाऊस title=
(Photo Credit : Social Media)

Aaditya Thackeray photo from Raghav Chadha and Parineeti Chopra Wedding: नुकताच आपचे खासदार राघव चड्ढा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांचा शाही विवाह सोहळा जयपूरमध्ये थाटामाटात पार पडला आहे. या विवाहसोहळ्याला राजकीय पुढारी ते चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. गेले दोन दिवस या दोघांच्या फोटोंनी अक्षरश सोशल मीडियावर धूमाकुळ घातला आहे,पण महाराष्ट्रात वेगळाच कल पाह्यला मिळतो. राघव परिणीतीच्या लग्नात आदित्य साहेब तुम्ही कधी लग्न करताय? असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून विचारला जातोय.. 

शिवसेना नेते (उबाठा) आदित्य ठाकरे यांनी सुद्धा राघव आणि परिणीतीच्या शाही विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती. पिस्ता कलरचा कुर्ता त्यावर थोडे हलक्या रंगाचे पेस्टल कलरचे जॅकेट आणि ऑफ व्हाईट रंगाचा पायजमा हा आदित्य ठाकरेंची पोषाख नेटीझन्सना सुद्धा चांगलाच पंसतीस पडलाय. नेहमी निळ्या रंगाच्या शर्टात वावरणारे आदित्य ठाकरे यांचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा बनलेला दिसतोय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

=

पण हा फोटो टाकल्यानंतर आदित्यला तुम्ही कधी लग्न करताय असा एकसूरात नेटीझन्सकडून प्रश्न विचारला जातोय. या फोटोत एका युजरने "साहेब तुमचा नंबर कधी ??? आमच्या कोल्हापुरात लगीन ठेवा आणि गोंधळाला तांबडा पांढरा करूया आपण!!!" असा सवाल केलाय तर दुसऱ्या युजरने "साहेब तुमच्या अशाच फोटोची वाट बघतोय आम्ही" असे सुद्धा कॉमेंट दिली आहे. तर एकाने पहिल्यांदा आदित्यला वेगळ्या पोशाखात पाहतोय असे म्हणत हार्ट इमोजी सेंड केली आहे. तर एका तरुणीने फोटोवर चक्क आदू असे उल्लेख करत फोटो इतका उशीरा का शेअर केला असा प्रश्न आदित्य यांना विचारला आहे. 

हेही वाचा : 'तेव्हा मी रांगेत...', लालबागकर नम्रता संभेरावनं सांगितला 'लालबागच्या राजा'चा मजेदार किस्सा!

एकंदरीत काय तर एकीकडे जसे तरुणवयात आल्यावर घरातली मंडळी लग्नाचे मनावर घ्या असा तरुणाईला आग्रह करताना आपल्याला दिसतात तसेच काहीसे या फोटोमुळे पाहायला मिळाले. हा फोटो टाकताच चाहत्यांनी अगदी घरच्यासारखेच आदित्य तुम्ही कधी लग्न करताय? अशा प्रश्नांचा भडिमार केलेला दिसतोय. आता आदित्य ठाकरेंना याआधी सुद्धा अनेकदा हा प्रश्न विविध मुलाखतींमध्ये विचारण्यात आलाय पण आता खुद्द चाहते किंवा कार्यकर्तेच लग्नाची विचारणा करताना पाहायला मिळते. आदित्य यांनी अजून तरी काही प्रतिक्रिया दिली नाही पण चाहत्यांचा या कॉमेंटमुळे आदित्य सुद्धा अचबिंत झाले असतील हे मात्र नक्की.