'लग्न झालं हे विसरलोच'; विकी जैन आणि सनामध्ये नेमकं काय घडलं?

Vicky Jain : विकी जैन सध्या बिग बॉसच्या घरात असून नुकतंच त्यानं केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Nov 27, 2023, 12:09 PM IST
'लग्न झालं हे विसरलोच'; विकी जैन आणि सनामध्ये नेमकं काय घडलं?  title=
(Photo Credit : Social Media)

Vicky Jain : 'बिग बॉस 17' मध्ये सगळ्यात जास्त माइंड गेम खेळण्यासाठी अंकिता लोखंडेचा नवरा विकी जैन ओळखला जातो. विकी अंकितासोबत या शोमध्ये आला असला तरी तो त्याचा वेगळा गेम खेळताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून विकी आणि सना रईस यांच्यात मैत्री होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. दोघं एकमेकांसोबत मस्ती करताना दिसतात कधी भांडताना दिसतात. आता नुकतंच असं काही झालं की विकी सनाला म्हणाला की तो विसरला की त्याचं लग्न झालं आहे. विकी असा का म्हणाला हे जाणून घेऊया. 

खरंतर, बिग बॉसमध्ये ऑरी गेस्ट म्हणून आला होता. त्यावेळी बिग बॉसनं स्पर्धकांना टास्क दिला होता की त्यांना ऑरीसाठी पार्टीचे आयोजन करायचे आहे आणि त्याचे मनोरंजन करायचे आहे. ब्रेन असलेल्या रुममध्ये विकी जैन, अनुराग डोभाल, अरुण, सनी आर्या आणि सना रईस खान त्याच्यासाठी पार्टीचे आयोजन करतात. सगळे त्याच्यासाठी गाणं गातात. त्यानंतर ते डान्सही करू लागतात. त्यानंतर ऑरी तिथून निघून जातो. तो बोलतो की त्याला बाथरुमला जायचं आहे. त्यानंतर सगळे पुन्हा एकदा प्लॅन करतात आणि म्हणतात की आता सना ऑरीसाठी डान्स करेल. ऑरी जेव्हा परत येतो तेव्हा विकी बोलतो की सना त्याचे मनोरंजन करेल. त्यानंतर विकी सनाला सांगतो की तिला ऑरीसोबत कसा डान्स करायचा आहे. यानंतर तो बोलतो की मला माफ कर, मी विसरलो की मी विवाहित पुरुष आहे. मी असं सगळं नाही करू शकतं. दरम्यान, काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात विकी आणि सना बराचवेळ एकमेकांचा हाथ पकडून बसल्याचे पाहायला मिळाले. 

हेही वाचा : राजकुमार कोहली यांच्या शोकसभेत हसणारा सनी देओल ट्रोलर्सच्या निशाण्यावर म्हणाले, 'दात दाखवून...'

ऑरी तिन्ही रुममध्ये पार्टी केल्यानंतर ठरवतो की या गेमचे विजेते हे दिलच्या रुममध्ये असलेले स्पर्धक आहेत. खरंतर ऑरीचे मनोरंजन करण्यासाठी समर्थ हा ऑरीचा चाहता असण्याचं नाटक करतो आणि त्याचं नाव पोटावर लिहितो. मुनव्वर आणि अभिषेक त्याचे फोटो काढू लागतात. ऑरीला हे आवडतं आणि तो दिलच्या रुममध्ये असलेल्या स्पर्धकांना विजेता ठरवतो. दरम्यान, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.