अवघ्या आठवड्याभरात स्लिम व्हायचंय? न चुकता दररोज 20 मिनिटे करा 'हे' काम?

Skipping Rope Benefits For Weight Loss: वाढलेलं वजन कमी करण्यासाठी प्रत्येकात जास्तीत जास्त एक आठवड्याचाच उत्साह असतो. अशावेळी दररोज 20 मिनिटे ही एक्सरसाईज करा आणि स्लिम ट्रिम व्हा. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 20, 2024, 11:46 AM IST
अवघ्या आठवड्याभरात स्लिम व्हायचंय? न चुकता दररोज 20 मिनिटे करा 'हे' काम? title=

Skipping Rope For Weight Loss: गेल्या 2-3 वर्षात अनेक लोकांचे वजन झपाट्याने वाढले आहे, याचे कारण म्हणजे कोरोना काळातला लॉकडाऊन आणि नंतर वर्क फ्रॉम होम अशा कारणांमुळे शारीरिक हालचाल झपाट्याने कमी झाली. याचा विपरित परिणाम शरीरावर झाला असून लठ्ठपणा आणि ओबेसिटीमुळे होणारे भयंकर आजार बळावत आहे. लठ्ठपणा कमी करणं खूप गरजेचं आहे, हा आजार नसला तरी तो अनेक समस्यांना आमंत्रण देतो, जसे की उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, मधुमेह, कोरोनरी आर्टरी डिसीज आणि ट्रिपल वेसल डिसीज. 

चरबी कमी करणे कठीण

आजच्या व्यस्त जीवनशैलीत, जिममध्ये तासनतास घाम गाळून पोट आणि कंबरेभोवतीची चरबी कमी करण्यासाठी प्रत्येकाला पुरेसा वेळ नसतो किंवा महागडा आहारतज्ज्ञही प्रत्येकाला परवडत नाही. अशावेळी आम्ही तुम्हाला अतिशय सोपी पद्धत वापरुन वजन कमी करु शकतात. अवघे 20 मिनिटे हे काम करुन व्हा स्लिम...

फक्त 20 मिनिटे करा ही एक्सरसाइज 

आज आम्ही तुम्हाला एक उपाय सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे वाढते वजन काही दिवसात कमी करू शकता आणि त्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. फिटनेस तज्ज्ञ ललित सिंह यांनी सांगितले की, तुम्ही दररोज 20 ते 25 मिनिटे दोरीवर उडी मारण्यासाठी वेळ काढला पाहिजे, ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

दोरीच्या उड्या मारणे फायदेशीर 

दोरीवर उडी मारल्याने तुमचे वजन लवकर कमी होण्यास मदत होते. बहुतेक फिटनेस तज्ज्ञांचे असे मत आहे की, तुम्ही हा व्यायाम दिवसातून किमान 20 मिनिटे केला पाहिजे. यामुळे सुमारे 300 कॅलरीज कमी होतील आणि शरीराचा स्टॅमिना देखील वाढेल.

दोरीवर उडी मारताना या गोष्टी लक्षात ठेवा

1. तुम्ही कधीही रिकाम्या पोटी दोरीवर उडी मारण्याचा प्रयत्न करू नका, यामुळे चक्कर येणे आणि पोटदुखी होऊ शकते.
2. खाल्ल्यानंतर लगेच दोरीवर उडी मारणे आरोग्यासाठी चांगले नाही, म्हणून जेवल्यानंतर 2-3 तासांनी करा.
3. दोरीवर उडी मारण्यापूर्वी हलका व्यायाम करणे आवश्यक आहे, यामुळे शरीर गरम होते आणि शरीर सक्रिय होते.

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)