Delhi Metro मध्ये तरुणीचा अश्लिल डान्स, Video पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल

Delhi Metro Viral Video : दिल्ली मेट्रोमध्ये महिलांसाठी रिझर्व्ह कोच का असतात? असा प्रश्न आता सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर (Girl dance in reserved ladies coach) विचारला जाऊ लागला आहे.

सौरभ तळेकर | Updated: May 19, 2024, 06:12 PM IST
Delhi Metro मध्ये तरुणीचा अश्लिल डान्स, Video पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल title=
Delhi Metro video viral girl dance in reserved ladies coach people commenting On Social Media

Delhi Metro Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. काही व्हिडीओ तुम्हाला खळखळून हसवतात. तर काही व्हिडीओमुळे तुम्ही सावध होता. कधी भांडणाचे व्हिडीओ तर कधी अश्लिल व्हिडीओ.. सोशल मीडियावर कोणतंही बंधन राहिलं नाहीये. अशातच आता पुन्हा एकदा दिल्ली मेट्रोमधील (Delhi Metro) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दिल्ली मेट्रो प्रवाशांच्या सुविधासाठी नाही तर बदनाम व्हिडीओमुळेच चर्चेत आल्याचं दिसतंय. दिल्ली लाईफलाईन मानली जाणारी मेट्रो आला रिल्स (Reels) बनवण्याची जागा झालीये का? असा प्रश्न विचारला जातोय.

काही दिवसांपूर्वी  'अंग लगा दे रे...मोहे रंग लगा दे रे...' या गाण्यावर अश्लील डान्स करताना दोन तरुणी दिल्या. त्यांच्यावर कारवाई देखील झाली होती. अशातच आता डीएमआरसीने अनेकदा इशारा देऊन सुद्धा दिल्ली मेट्रोमध्ये नाच गाणं सुरू असल्याचं पहायला मिळतंय. सध्या ट्विटरवर एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक तरुणी स्कर्ट आणि क्रॉप टॉप घातल्याचं दिसतंय. मेट्रो सुरू असताना तरुणीच्या साथीदाराने व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू केलं.

कॅमेरा ऑन झाल्यानंतर महिलेने दिल्ली मेट्रोमध्ये अश्लिल डान्स केला. रील शुट करण्यासाठी महिलेने असं कृत्य केलं. सध्या ट्रेंडमध्ये असलेला हा व्हिडीओ NCMIndia Council For Men Affairs ने शेअर केला आहे. यामध्ये महिला भोजपुरी गाण्यावर नाचताना दिसत आहे. तरुणी डान्स करत असताना डब्यात असलेल्या महिलेला त्रास झाल्याचं देखील दिसून आलं. त्यामुळे नेटकऱ्यांनी तरुणीच्या व्हिडीओवर आक्षेप घेतलाय.

दरम्यान, तरुणीचे इंस्टाग्राम प्रोफाइल मेट्रो डान्स रील्सने भरलेले आहे. दिल्ली मेट्रोने महसुल शेअर करण्याचा करार मान्य तर केला नाही ना? असा सवाल NCMIndia ने विचारला आहे. सरकारला विनंती आहे की या प्रजातीसाठी कठोर कायदा करावा, कारण समाजात अर्धनग्नता पसरवली जात आहे जी आपल्या देशाच्या संस्कृतीसाठी घातक आहे, असं एका नेटकऱ्याने लिहिलं आहे.