देशातील सर्वात मोठा GST घोटाळा; पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर GST अधिकारीही चक्रावले

धुळ्यात मोठा GST घोटाळा उघडकीस आला आहे. पोलिसांची एक टोळी बनावट GST अधिकारी असल्याचे भासवून वाहन चालकांना लुटत होती.  

Updated: Feb 5, 2024, 07:08 PM IST
देशातील सर्वात मोठा GST घोटाळा; पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर GST अधिकारीही चक्रावले title=

Dhule Crime News : देशातील सर्वात मोठा GST घोटाळा उघडकीस आला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर GST अधिकारीही चक्रावले आहेत.   पोलिसांच्या एका अजब टोळीचा धुळे जिल्हा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांची ही टोळी बनावट GST अधिकारी असल्याचे भासवून वाहन चालकांना गंडवत होती. या टोळीने सुमारे दीड कोटी रुपये गंडवले असून, या कामात एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा वरदहस्त असल्याची चर्चा असून, हा घोटाळ्याची व्याप्ती संपूर्ण देशाता आहे.

संपूर्ण देशात सुरु असलेल्या GST घोटाळ्याचा धुळ्यात भंडाफोड झाला आहे. धुळे जिल्हा पोलिसात कार्यरत बिपीन पाटील आणि इम्रान शेख या दोघं पोलिसांनी टोळी बनवत GST घोटाळा केल्याचे समोर आले आहे. एक वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावावर पोलीस दलातील एक वाहन हे पोलीस महामार्गांवर घेऊन जायचे. स्वतः GST अधिकारी आहे असे ते भासवायचे. लाल दिव्याचे सरकारी लाहन पाहून महामार्गांवर अडविण्यात आलेल्या वाहन चालकांचा या टोळीवर विश्वास बसायचा.  CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेत येणार नाही अशा ठिकाणी हे वाहन उभे करायचे. वाहन चालकांना GST पावती दाखवयला सांगायचे.  GST थकीत हप्ता बुडवल्याचे सांगून पोलिसांनी ही टोळी, तोडीपाणी करायची. आतापर्यंत सुमारे दीड कोटींचे गभाड समोर आले आहे.

या टोळीने अनेक जिल्ह्यात वाहन चालकांना अशा पद्धतीने लुबाडल्याचे समोर आले आहे.  विशेष म्हणजे ही पोलिसांची टोळी लचेची रक्कम ऑनलाईन स्वीकारायची. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. यात बिपीन पाटील आणि इम्रान शेख या पोलिसांना समावेश आहे. स्वाती पाटील आणि विनय बागुल यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता. मात्र, पोलिसांकडे ठोस पुरावे मिळत नव्हते, अखेर पोलिसांनी बँकेमध्ये झालेल्या व्यवहारांची तपासणी केली आणि या सर्व प्रकाराचा भांडाफोड झाला.

धुळ्यामध्ये हे बनावट जीएसटी प्रकरण जे समोर आलेला आहे. त्यात एक कोटी बेचाळीस लाखांचा अपहार दिसून येत आहे. याची व्याप्ती अजून खूप मोठी असल्याची ही चर्चा आहे. धुळ्यातील पोलिसांकडून सुरू असलेली ही वसुली हिमनगाचं टोक आहे. या टोळीचा ऑपरेट करणारे प्रमुख हे अजून अन्य राज्यांमध्ये असल्याची चर्चा देखील आहे. देशातील अनेक भागांमध्ये या अशा पद्धतीने वाहन चालकांची लुबाडणारी टोळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे जीएसटी विभागाने देखील लक्ष घातल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि कुठल्या बड्या अधिकाराच्या वरदहस्थामुळे ही टोळी काम करत होती? याचाही तपास लावण्याची मागणी केली जात आहे.