चक्क रस्ताच आरोपीच्या पिंजऱ्यात, पाहा काय आहे प्रकार?

एका महिलेने केलेल्या तक्रारीमुळे औरंगाबाद ( Aurangabad )पोलीस (Police) चक्रावून गेले आहेत.  

Updated: Dec 18, 2020, 04:45 PM IST
चक्क रस्ताच आरोपीच्या पिंजऱ्यात, पाहा काय आहे प्रकार?  title=

विशाल करोळे / औरंगाबाद : एका महिलेने केलेल्या तक्रारीमुळे औरंगाबाद ( Aurangabad )पोलीस (Police) चक्रावून गेले आहेत. (Case Filled Against Road In Police Station at Aurangabad )कारण ही तक्रार आहे औरंगाबाद-जळगाव रस्त्याविरोधात. रस्त्याच्या विरोधातल्या या तक्रारीनंतर नक्की कुणावर कारवाई करावी, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

आरोपी रस्ता. (Aurangabad accused road) औरंगाबाद जळगाव महामार्ग. आर्थिक, मानसिक आणि शारिरीक छळ केल्याची तक्रार या रस्त्याविरुद्ध आहे. फुलंब्रीच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये तंत्रज्ञ म्हणून कामाला असलेल्या संध्या घोळवे-मुंडे यांनी फुलंब्री पोलीस ठाण्यात ही तक्रार केलीय. याच रस्त्यावरून त्या रोज दुचाकीवरून ये-जा करतात. मात्र खराब रस्त्यामुळं त्यांना पाठदुखी, मणके दुखीचा त्रास होऊ लागला. अखेर पोलिसांकडे दाद मागावी, म्हणून त्यांनी थेट रस्त्याविरुद्धच तक्रार दाखल केली, अशी माहितती तक्रारदार संध्या घोळवे यांनी दिली. 

या तक्रारीनंतर पोलीस चक्रावून गेले आहेत. आता रस्त्यावर गुन्हा दाखल तरी कसा करावा असा प्रश्न त्यांना पडलाय. महिलेनं राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, अशी विनंती आता पोलिसांनी केली आहे. याबाबत फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी माहिती दिली.

अजिंठा सारख्या जागतिक पर्यटन केंद्राला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे. अगदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही या रस्त्याबद्दलच्या तक्रारी गेल्यात. पण रस्त्याची दुरावस्था तशीच आहे.