CBSE Board Exam 2023: 10वी, 12वीच्या परीक्षेला सुरुवात, 'या' आहेत मार्गदर्शक सूचना

CBSE Board Exam 2023: सीबीएसई दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेला आजपासून सुरूवात झाली असून 5 एप्रिलपर्यंत चालणार आहेत. दहावीच्या परीक्षा 16 दिवस तर बारावीच्या परीक्षा 36 दिवस आहेत. 

Updated: Feb 15, 2023, 12:08 PM IST
CBSE Board Exam 2023: 10वी, 12वीच्या परीक्षेला सुरुवात, 'या' आहेत मार्गदर्शक सूचना title=
CBSE Board Exam 2023

CBSE Board Exam 2023: केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा आजपासून (15 फेब्रुवारी) सुरूवात होत आहे. यावर्षी 38 लाख 83 हजार 710 विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसणार आहेत. अशातच परीक्षा केंद्रावर विद्यार्थांचा गोंधळ होऊ नये म्हणून बोर्डाकडून काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

दरम्यान सीबीएसईकडून इयत्ता दहावीची परीक्षा 76 विषयांसाठी घेतली जाईल आणि इयत्ता बारावीची परीक्षा एकूण 115 विषयांसाठी घेतली जाईल. दहावीसाठी 7240 परीक्षा केंद्रे तर बारावीच्या परीक्षेसाठी 6759 केंद्रांचे नियोजन करण्यात आलं आहे. सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार यंदा 38 लाखांहून अधिक विद्यार्थी सीबीएसई बोर्डाची परीक्षा देणार आहेत. त्यापैकी 21 लाख 86 हजार 940 विद्यार्थी दहावीची तर 16 लाख 96 हजार 770 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसणार आहेत. सीबीएसईने बोर्डाच्या परीक्षांसाठी देशात आणि परदेशात 7 हजार 250 हून अधिक परीक्षा केंद्रे स्थापन केली आहेत. 10वीची परीक्षा 16 दिवसांत संपणार आहे तर बारावीच्या परीक्षेला 36 दिवस लागतील. शेवटचा पेपर ५ एप्रिल रोजी असणार आहे. 

वाचा: कुर्ल्यात इमारतीला भीषण आग, एका महिलेचा मृत्यू 

परीक्षेच्याा मार्गदर्शक सूचना

  • सकाळी 10 नंतर विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही.  त्यामुळे परीक्षेला वेळेआधीच पोहचा
  • परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी शालेय गणवेश परिधान करावा आणि शाळेचे ओळखपत्र सोबत ठेवावं. तसेच विद्यार्थ्याकडे सीबीएसईचं प्रवेशपत्र (Hall Ticket) असावं.
  • केंद्राकडून परवानगी असलेलं स्टेशनरी साहित्य (Stationery) परीक्षा केंद्रावर घेऊन जाता येईल. त्याव्यतिरिक्त इतर कोणतंही सामान सोबत नेऊ नका.
  • इलेक्ट्रॉनिक उपकरणं किंवा मोबाईल फोन, जीपीएस, कॅल्क्युलेटर, गॅझेट्स, इलेक्ट्रॉनिक घड्याळे इत्यादी सोबत ठेवू नका.
  • प्रवेशपत्रावर दिलेलं नियम नीट वाचा आणि त्यांचं पालन करणं सर्व विद्यार्थ्यांसाठी अनिर्वाय आहे.
  • परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरमार्ग निवडू नका आणि सर्व नियमांचं योग्यरित्या पालन करा.
  • परीक्षेसंदर्भात कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका आणि कोणत्याही प्रकारच्या अफवांचा भाग बनू नका.