आनंद दिघे नावावरुन दोन शिवसैनिक समोरासमोर; शिंदे विरुद्ध ठाकरे वाद कुठपर्यंत जाणार?

Shinde Vs Thackeray:  आनंद दिघे नावावरुन दोन शिवसैनिक समोरासमोर आले आहेत. ते एकमेकांबद्दल गौप्यस्फोट करत आहेत.

Updated: May 18, 2024, 08:54 PM IST
आनंद दिघे नावावरुन दोन शिवसैनिक समोरासमोर; शिंदे विरुद्ध ठाकरे वाद कुठपर्यंत जाणार? title=
Shinde Vs Thackeray

Shinde Vs Thackeray: आनंद दिघे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू आणि कडवे शिवसैनिक. ठाण्यात शिवसेनेला रुजवण्यात दिघेंचा सिंहाचा वाटा हे सर्वांनाच माहिती आहे. पण आता आनंद दिघेंवरून मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलाय. त्यामुळे आनंद दिघे नावावरुन दोन शिवसैनिक समोरासमोर आले आहेत. ते एकमेकांबद्दल गौप्यस्फोट करत आहेत.

उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंना मानसिक त्रास दिल्याचा आरोप मुख्यमंत्री शिंदेंनी केलाय. आनंद दिघे हे राज ठाकरेंची बाजू घ्यायचे...त्यामुळं उद्धव ठाकरेंना पोटदुखी व्हायची, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री शिंदेंनी झी २४तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांना दिलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत केलाय.

दरम्यान,घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना काडीचीही किंमत देत नाही अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या आरोपाला उत्तर दिलंय.

Maharastra Politics : राज ठाकरेंच्या आरोपाला शिंदेंकडूनच छेद, 'बाळासाहेबांनी भुजबळांना माफ केलं होतं'

आनंद दिघेंवरून उद्धव ठाकरेंवर आरोप करण्याची मुख्यमंत्री शिंदेंची ही पहिलीच वेळ नाहीय. दिघेंच्या मृत्यूवरून आजही अनेकदा संशय उपस्थित केला जातो. शिवसेना पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर आरोपांची मालिकाच सुरू केली होती. 

आनंद दिघेंसोबत जे झालं ते सांगितलं तर भूकंप येईल, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं होतं. दिघेंच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित करून शिंदेंनी ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीमध्ये दिघेंवरून ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री शिंदेंनी केल्याची चर्चा आहे.

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना