महापौर चषक कु्स्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरीचाच 'विजय'

ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी आणि अहमत सिलबिस्ट यांच्यात अटीतटीची लढत झाली. 

Jaywant Patil Updated: Mar 26, 2018, 01:53 AM IST
महापौर चषक कु्स्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरीचाच 'विजय' title=

पुणे : पुण्यात आयोजित महापौर चषक कु्स्ती स्पर्धेत ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यानं तुर्कस्तानचा मल्ल अहमत सिलबिस्ट, याला मात दिली. लाल मातीत कुस्तीचा हा थरार रंगला. या ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी आणि अहमत सिलबिस्ट यांच्यात अटीतटीची लढत झाली. 

एकमेकांना चित करण्याचा पुरेपूर प्रयत्न

डाव प्रतिडाव टाकून दोन्ही मल्लांनी एकमेकांना चित करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. सुमारे चार मिनिटं चाललेल्या या झुंजीत, अखेर विजय चौधरीनं अहमत सिलबिस्टला आस्मान दाखवलं आणि मैदानात विजय चौधरीच्या चाहत्यांनी एकच जल्लोष करत, विजयी घोषणांनी मैदान दुमदुमून सोडलं. 

कॉलेज मैदानावर कुस्त्यांचा थरार

पुण्यातल्या एमआयटी कॉलेज मैदानावर कुस्त्यांचा हा थरार रंगला. महाराष्ट्र आणि तुर्कस्तानच्या मल्लांमधल्या लढती हे या स्पर्धेचं खास आकर्षण ठरलं.