आज पंतप्रधान शिर्डीत; साईबाबांच्या दर्शनानंतर विविध प्रकल्पांचे लोकार्पण, कसा असेल दौरा?

PM Modi Visit Shirdi: पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मोदी यांच्या सभेला सुमारे एक लाख नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन सभास्थळाचे नियोजन करण्यात आले आहे.

Updated: Oct 26, 2023, 07:36 AM IST
आज पंतप्रधान शिर्डीत; साईबाबांच्या दर्शनानंतर विविध प्रकल्पांचे लोकार्पण, कसा असेल दौरा? title=
PM Modi visit maharashtra to inaugurate various projects in Shirdi today

PM Modi Visit Maharashtra: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज महाराष्ट्राच्या मुंबई आणि नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. नगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध धार्मिक स्थळ शिर्डी मंदिरात जाऊन साईबाबांचे दर्शन घेणार आहेत. या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दर्शनासाठी चार रांगांचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते करण्यात येईल. त्याचबरोबर, उत्तर नगर जिल्ह्यातील जिरायती भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार आहे. त्याचबरोबर इतर प्रकल्पांचेही आज लोकार्पण होत आहेत. (PM Modi Visit Shirdi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी एकच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे पोहोचणार आहात. त्यानंतर श्री साईबाबा समाधी मंदिरात पंतप्रधान मोदी पूजा आणि दर्शन करुन मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटनही करणार आहेत.  दुपारी  दोन वाजता पंतप्रधान निळवंडे धरणाचे जलपूजन करतील आणि धरणाच्या कालव्याचे जाळे राष्ट्राला समर्पित करतील.

दुपारी ३.१५ च्या सुमारास पंतप्रधान मोदी शिर्डी येथे एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहून आरोग्य, रेल्वे, रस्ते आणि तेल आणि वायु यांसारख्या क्षेत्रातील सुमारे ७ हजार ५०० कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील. 

शिर्डी येथेली नवीन दर्शन रांग संकुलाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन 

शिर्डी संस्थान येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त  नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या नवीन इमारतीत विविध सुविधांची सोय करण्यात आली आहे. यामध्ये १० हजारांहून अधिक भाविकांच्या एकत्रित आसन क्षमतेसह अनेक वेटिंग हॉल, क्लोक रूम, स्वच्छतागृहे, बुकिंग काउंटर, प्रसाद काउंटर, माहिती केंद्रासारख्या वातानुकूलित कक्षांची सोय करण्यात आली आहे .

निळवंडे धरणाचे जलपूजन व डाव्या काठाचे कालव्याचे लोकार्पण

शिर्डी संस्थानचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी निळवंडे धरणाच्या डाव्या काठाचे (८५ किमी) कालव्याचे जाळे राष्ट्राला समर्पित करतील. यामुळे पाण्याचे पाइप वितरण जाळे सुकर होईल व सात तालुक्यांतील (अहमदनगर जिल्ह्यातील सहा आणि नाशिक जिल्ह्यातील एक) १८२ गावांना याचा लाभ होईल. या धरणासाठी सुमारे ५ हजार १७७ कोटी रुपये खर्चून ते विकसित केले जात आहे.

‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ चा शुभारंभ

‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ चा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शुभारंभ होणार. या योजनेचा महाराष्ट्रातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या ८६ लाखाहून अधिक लाभार्थ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची अतिरिक्त रक्कम देऊन त्यांना लाभ होईल.