अभिनेत्री मृणाल दुसानिस लग्नाच्या बेडीत

कलर्स वाहिनीवरील 'अस्स सासर सुरेख बाई' या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्री मृणाल दुसानिस नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकलीये. 

Updated: Feb 28, 2016, 11:44 AM IST
अभिनेत्री मृणाल दुसानिस लग्नाच्या बेडीत title=

मुंबई : कलर्स वाहिनीवरील 'अस्स सासर सुरेख बाई' या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्री मृणाल दुसानिस नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकलीये. 

२५ फेब्रुवारी रोजी नाशिकमध्ये तिचा लग्नसोहळा पार पडला. नीरज मोरे हा तिचा पती असून तो सॉफ्टवेअर इंजिनीयर आहे. गेल्या सहा वर्षांपासून नीरजचे वास्तव्य अमेरिकेत आहे. त्यामुळे मालिका संपल्यानंतर मृणालही अमेरिकेत जाणार आहे.

झी मराठीवरील 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेतून मृणालने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. पदार्पणातच तिच्या मालिकेला चांगली प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर 'तू तिथे मी' या गाजलेल्या मालिकेतही तिने प्रमुख भूमिका साकारली होती. सध्या ती 'अस्स सासर सुरेख बाई' या मालिकेत काम करतेय.