नारळ पाणी प्यायल्यावर मलाई खाता का? तज्ज्ञ सांगता की...

Benefits of Coconut Cream : नारळ पाणी प्यायल्यावर त्याची मलाई खाण्याची मजाच काही और असते. पण ही मलाई खाल्ल्यानंतर शरीरावर काय परिणाम होतात तुम्हाला माहिती आहे का?

Apr 27, 2024, 15:30 PM IST
1/7

नारळपाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाय़ी नारळ पाणी उत्तम स्त्रोत आहे. 

2/7

फक्त नारळपाणीच नाही तर मलाई खाण्याचेही आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. नारळ क्रीम किंवा मलाईमध्ये जास्त प्रमाणात फायबर आढळतं. त्यामुळे आपल्याला पचनतंत्र सुधारण्यात मदत मिळते. 

3/7

मलाईमध्ये सर्वाधिक कॅलरीज असतात ज्यामुळे वजन वाढण्यास मदत मिळते. त्यामुळे ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांनी नारळपाणी प्यायल्यानंतर मलाई खावी.

4/7

शहाळ्यातील मलई ही आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. गुड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यास मदत करते. 

5/7

नियमित मलईचं सेवन केल्यास उष्णेतपासून आराम मिळतो. 

6/7

तज्ज्ञांनुसार एक व्यक्ती दररोज 40 ग्रॅम नारळाचं सेवन करु शकतो. 

7/7

नारळ मलाईचं सेवन हे रिकाम्या पोटी करायला हवं. त्यामुळे हे दिवसभर तुम्हाला तेजदार ठेवण्यास मदत करतं. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)