जबरदस्त मायलेज, दमदार फिचर्स अन् सुरक्षाही अचूक; Tata आणतीये NEXON CNG कार, किंमत फक्त...

टाटा मोटर्स आता आपली Nexon CNG लाँच करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. सर्व काही सुरळीत झालं तर कंपनी याचवर्षी ही कार लाँच करु शकते.   

May 19, 2024, 20:42 PM IST

टाटा मोटर्स आता आपली Nexon CNG लाँच करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. सर्व काही सुरळीत झालं तर कंपनी याचवर्षी ही कार लाँच करु शकते. 

 

1/11

डिझेल आणि पेट्रोलनंतर कंपन्या आता इंधनाचा नवा पर्याय शोधत आहेत. टाटा मोटर्सही आता सीएनजी प्रोफाईलवर जास्त लक्ष देत आहे.   

2/11

नुकतीच कंपनीने आपली Punch CNG लाँच केली होती. हिंची किंमत 7 लाख 23 हजारापासून सुरु होते.   

3/11

आता कंपनी Nexon CNG लाँच करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. सर्व काही सुरळीत झालं तर कंपनी याचवर्षी ही कार लाँच करु शकते.   

4/11

Tata Nexon ला 2017 मध्ये सर्वात आधी लाँच करण्यात आलं होतं. तेव्हापासून कंपनी बेस्ट सेलिंग मॉडेलपैकी एक आहे. आतापर्यंत ही एसयुव्ही पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे.   

5/11

Nexon iCNG मध्ये कंपनी ड्युअल-सिलेंडर तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. यामध्ये कारच्या डिक्कीत दोन सिलेंडर दिले जातात. यामुळे बूटस्पेसशी तडजोड करावी लागत नाही.   

6/11

टाटाने या तंत्रज्ञानाचा वापर सर्वात आधी अल्ट्रॉज आणि पंच सीएनजी मॉडेलमध्ये केला होता. यानंतर टिएगो आणि टिगोरमध्ये देण्यात आला.   

7/11

Nexon CNG मध्ये किमान 230 लीटरचा बूट स्पेस मिळेल अशी अपेक्षा आहे. स्पेअर व्हिलला कंपनीने कारच्या बूटच्या खालील भागात जागा दिली आहे.   

8/11

Nexon CNG मध्ये कंपनी 1.2 लीटरच्या 3 सिलेंडर टर्बो पेट्रोलचं इंजिन देत आहे. हे इंजिन सामन्यत: 120Ps ची पॉवर आणि 170Nm चा टॉर्क जनरेट करतं.   

9/11

CNG मध्ये पॉवर आऊटपूटवर थोडा फरक पडेल. याला 5 स्पीड मॅन्यूअल आणि संभाव्यपणे ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्येही सादर केलं जाईल.   

10/11

टाटा मोटर्सने नुकतंच देशातील पहिली CNG ऑटोमॅटिक कार लाँच केली होती. त्यामुळे Nexon CNG मध्येही ऑटोमॅटिक पर्याय मिळतील अशी आशा व्यक्त होत आहे.   

11/11

लाँच होण्याआधी किंमतीबद्दल काही बोलणं थोडं कठीणच आहे. पण अंदाजानुसार या कारची किंमत 9 लाख 25 हजारांपासून सुरु होण्याची शक्यता आहे.