Lionel Messi च्या बायोपिकमध्ये अक्षय कुमार दिसणार? Photo होतायत व्हायरल

Fifa World Cup Argentina Wins : फिफाच्या (FIFA World Cup Final 2022) अंतिम सामन्यात पेनल्टी शूट आऊटवर (Penalty shootout) अर्जेंटिनाने फ्रान्सवर 4-2 अशी मात केली. या विजयानंतर अर्जेंटिनाने 36 वर्षानंतर पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकला आहे.

Updated: Dec 19, 2022, 10:31 PM IST
Lionel Messi च्या बायोपिकमध्ये अक्षय कुमार दिसणार? Photo होतायत व्हायरल  title=

Fifa World Cup Argentina Wins : फिफा वर्ल्डकप 2022 वर अर्जेंटिनाने नाव कोरले आहे. फिफाच्या (FIFA World Cup Final 2022) अंतिम सामन्यात पेनल्टी शूट आऊटवर (Penalty shootout) अर्जेंटिनाने फ्रान्सवर 4-2 अशी मात केली. या विजयानंतर अर्जेंटिनाने 36 वर्षानंतर पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकला आहे. हा वर्ल्ड कप मेस्सीसाठी शेवटचा होता. त्यामुळे अर्जेंटिना संघाने हा वर्ल्ड कप जिंकून लियोनेल मेस्सीला सुखद निरोप दिला आहे. आता मेस्सीच्या निवृत्तीची चर्चा असतानाच, त्याच्या आयुष्यावर बायोपिक देखील येत आहे. या बायोपिकमध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार दिसणार आहे. मात्र या बातमीत किती तथ्य आहे हे जाणून घेऊयात. 

अक्षयचा फोटो व्हायरल 

अर्जेंटिनाच्या (Argentina Wins) विजयानंतर अनेकांनी सोशल मीडियावर मेस्सीचे स्टेटस ठेवले होते. त्याचवेळी सोशल मीडियावर अक्षय कुमारचा (Akshay Kumar) फोटो देखील व्हायरल झाला होता. या फोटोत अर्जेंटीना संघाच्या जर्सीत अक्षय कुमार दिसला होता. त्याच्या हातात फुटबॉल देखील होता. आणि तो मैदानावर उभा असल्याचे दिसले होते. त्यामुळे अनेक  नेटकऱ्यांनी असा कयास लावला होता की, मेस्सीच्या (Lionel Messi) बायोपिकमध्ये अक्षय कुमार दिसणार आहे. 

नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) फोटोवर नेटकरी भन्नाट कमेंट करत होते. अक्षय कुमार त्याच्या पुढच्या चित्रपटासाठी तयार असल्याचे एका य़ुझरने म्हटलेय. तर दुसऱ्या युझरने या बायोपिकचे नावही सुचवले असून अक्षय कुमारची भूमिका असलेला लिओनेल मेस्सी: द लिजेंड ऑफ अर्जेंटिना बायोपिक येत आहे. तिसऱ्या युझरने लिहले की, अक्षय कुमारने मेस्सीवरील बायोपिकची घोषणा केली आणि त्याने चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. या सर्व कमेंट्सनंतर सोशल मीडियावर मेस्सीच्या बायोपिकमध्ये अक्षय कुमार (Akshay Kumar) झळकणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. 

खरं कारण काय?

अक्षय कुमार (Akshay Kumar) मेस्सीच्या बायोपिकमध्ये काम करत नाही आहे, ही निव्वळ एक अफवा आहे. मेस्सीने त्याच्या आयुष्यावर बायोपिक बनणार आहे की नाही, याबाबत अद्याप कोणतीच घोषणा केली नाही आहे. मात्र व्हायरल होणारा अक्षयचा हा फोटो त्याच्या 'हाऊसफुल 3' सिनेमातला आहे. हा फोटो व्हायरल होत असल्याने अनेकांना तो बायोपिकमध्ये दिसणार असल्याची चर्चा सुरु झाली होती.  

दरम्यान फिफा वर्ल्ड कप पाहण्यासाठी अनेक बॉलिवूड स्टार्स कतारला पोहोचले होते. या यादीत शाहरुख खान, दीपिका पदुकोण, करिश्मा कपूर, कार्तिक आर्यन आणि अनेक सेलिब्रिटींचा समावेश होता. या संदर्भातले फोटो देखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.