IPL 2023: RCB कडून 'या' दोन दिग्गजांचा अनोखा सन्मान; 17 आणि 333 नंबरची जर्सी रिटायर्ड!

AB de Villiers and Chris Gayle: इंडियन प्रीमियर लीगमधील फॅन्चायझी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने घोषणा केली आहे. आयसीबीचे दोन महान खेळाडूंनी परिधान केलेले जर्सी रिटायर्ड करण्याची घोषणा आरसीबीने केली आहे.

Updated: Mar 21, 2023, 07:16 PM IST
IPL 2023: RCB कडून 'या' दोन दिग्गजांचा अनोखा सन्मान; 17 आणि 333 नंबरची जर्सी रिटायर्ड! title=
RCB retired Jersey numbers 17 and 333

AB de Villiers and Chris Gayle: आयपीएलच्या आगामी हंगामास येत्या 31 मार्चपासून सुरूवात होत आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच आता आयपीएल (IPL 2023) सुरू होण्यापूर्वी आयसीबीने (RCB) चाहत्यांना खुशखबर दिली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एबी डिव्हिलियर्स (AB deVilliers) आणि ख्रिस गेल (Chris Gayle) यांचा अनोख्या पद्धतीने सन्मान केलाय. (RCB retired Jersey numbers 17 and 333 forever as a tribute to AB deVilliers and Chris Gayle before IPL 2023)

इंडियन प्रीमियर लीगमधील फॅन्चायझी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने घोषणा केली आहे. आयसीबीचे दोन महान खेळाडूंनी परिधान केलेले जर्सी रिटायर्ड (RCB Retired Jersey Numbers 17 and 333) करण्याची घोषणा आरसीबीने केली आहे. आरसीबीचा महान खेळाडू एबी डिव्हिलियर्स याची 17 नंबरची (AB deVilliers Jersey Numbers) जर्सी रिटायर्ड करण्यात आली आहे. 

RCB च्या जर्सी रिटायर्ड

एबी डिव्हिलियर्स याच्यासह वर्ल्ड क्रिकेटमध्ये युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलची जर्सी (Chris Gayle Jersey Numbers) क्रमांक 333 ची निवृत्ती झाली आहे. त्यांना 26 मार्च रोजी आयपीएलच्या हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट केले जाईल, अशी माहिती आरसीबीने ट्विट करत दिलीये.

विशेष म्हणजे, हॉल ऑफ फेम (Hall of Fame) सोहळा 26 मार्च रोजी बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर अनबॉक्स समारंभ आयोजित करण्यात आलाय. एबी डिव्हिलियर्सने नोव्हेंबर 2021 मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

दरम्यान, डिव्हिलियर्सने आरसीबीसाठी 2011 ते 2021 पर्यंत 11 सीझन खेळले आहेत. RCB कडून फ्रँचायझीसाठी 156 सामन्यांमध्ये त्याने 4,491 धावा केल्यात. तर ख्रिस गेल आरसीबीसाठी एकूण 7 हंगाम खेळला आहे.

RCB ला लागली लॉटरी

इंग्लंडचा विल जॅक (will jack injury) दुखापतग्रस्त झाल्याने तो आयपीएलच्या येत्या हंगामात खेळणार नाही. त्याच्या जागी न्यूझीलंडच्या मायकेल ब्रेसवेलचा (Michael Bracewell) संघात समावेश केलाय. त्यामुळे विराटची (Virat Kohli) नांदी झाल्याचं पहायला मिळतंय.