election rally

मुखवटा नाही, जिद्दीने निवडणूक लढवतोय - राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर नाव न घेता हल्लाबोल केला. मला कोणाच्या मुखवट्याची गरज नाही. मी नरेंद्र मोदींना 2011मध्येच जाहीर पाठिंबा दिला आहे. जे बोललो आहे ते जाहीर. मला सेटींग करायचेही नाही. माझे खासदार निवडून येणारच आणि ते दिल्लीत आवाज उठवतील. मी बाहेर राहून सत्ताधाऱ्यांना हादरवू शकतो तर आत आलो तर काय करू शकतो, असा परखड इशारा राज ठाकरे यांनी दिला.

Apr 18, 2014, 09:39 PM IST

राजना टोला, लायकी नसताना `सुपा`एवढे दिले - शिवसेना

बाळासाहेब लाखोंचे पोशिंदे होते. बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या पोटाची भाषा केली. ज्यांना लायकी नसताना `सुपा`एवढे दिले, ते बाळासाहेबांना पाठवलेल्या एका चिकन सुपाचे बिल जाहीर सभांतून फडकवतात. हा निलाजरेपणाच नाही काय?, असा खरमरीत अग्रलेख `सामना` या शिवसेनेच्या मुखमत्रात लिहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जोरदार चिमटा काढला आहे.

Apr 5, 2014, 12:56 PM IST

शिवसेनेचा प्रचार धडाका, उद्धव ठाकरेंच्या १९ सभा

शिवसेनेच्या प्रचाराचा धडाका उद्यापासून पाहायला मिळणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभांचा झंझावात दिसणार आहे. राज्यभरात तसा दौरा आखण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने प्रचाराचेरणशिंग फुंकले आहे.

Apr 3, 2014, 12:44 PM IST