Royal Enfield Himalayan 450 घ्यायचा नाद आता सोडावा लागणार? नव्या वर्षापासून...

ऑफरोडिंगचं वाढतं वेड पाहता अनेकांचाच कल बाईक राडडिंगकडे आणि त्यातही ऑफरोडिंगकडे दिसून येत आहे. याच कारणास्तव सध्याच्या तरुणाईकडून Royal Enfield Himalayan 450 ला कमाल पसंती मिळत आहे.   

सायली पाटील | Updated: Dec 21, 2023, 12:22 PM IST
Royal Enfield Himalayan 450 घ्यायचा नाद आता सोडावा लागणार? नव्या वर्षापासून...  title=
Royal Enfield Himalayan 450 price hike from january 1

Royal Enfield Himalayan 450 : वजनदार बाईक्स, कमालीचा सस्पेन्शन, मायलेज आणि दमदार लूक अशा सर्व गोष्टी एकाच बाईकमध्ये हव्या झाल्या अनेकजण डोळे झाकून रॉयल एनफिल्डच्या बाईकना पसंती देतात. ऑफरोडिंग आणि एनफिल्डच्या बाईक जे समीकरण कैक वर्षांपासून चालत आलं आहे. इतकं की, आता कंपनीकडून बाईकर्सच्या गरजा लक्षात घेता नवनवीन मॉडेल डिझाईन केले जात आहेत. त्यातलं एक म्हणजे Royal Enfield Himalayan 450. 

काही दिवसांपूर्वीच कंपनीकडून मोटोवर्समध्ये हिमालयन 450 लाँच करण्यात आली. सरुवातीला या बाईकची किंमत 2.69 लाखांच्या घरात होती. या बाईकच्या टॉप मॉडेल असणाऱ्या टॉप-ऑफ़-द-लाइन समिट ट्रिम हेनले ब्लॅक आणि कॉमेट व्हाईट पेंट स्कीमचे एक्स शोरूम दर अनुक्रमे 2.79 लाख आणि 2.84 लाख रुपये इतके सांगण्यात आले होते. आता मात्र या बाईकच्या किमतीत वाढ होणार आहे. त्यामुळं कसेबसे पैसे जुळवून ही बाईक घेणाऱ्यांना हा धक्का असणार आहे. 

हेसुद्धा वाचा : Christmas 2023 च्या सुट्टीसाठी आयत्या वेळी कुठे जायचं? 'ही' ठिकाणं ठरतील 'पैसा वसूल' करणारे पर्याय 

31 डिसेंबरच्या आधी ऑनलाईन बुकिंग किंवा शोरून बुकिंग केली असता ही बाईक तुम्हाला इंट्रोडक्ट्री किंमतीवर खरेदी करता येणार आहे. पण, 1 जानेवारीपासून मात्र बाईकचे दर वाढतील. त्यामुळं आता वाढीव रकमेसाठी तयार राहा किंवा मग एनफिल्डची हिमालयन 450 विकत घेण्याच्या स्वप्नाला काहीसा ब्रेक मारा. 

बाईकचे फिचर ठरतायच चर्चेचा विषय 

जबरदस्त पॉवर जनरेट करण्यासाठी हिमालयन 450 ला 450 सीसी लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आलं आहे. ज्यातून 40 Nm पीक टॉर्क आणि 40 hp पॉवर जनरेट होते. हे इंजिन  6-स्पीड गियरबॉक्सनं जोडण्यात आलं आहे. 

स्टील ट्विन-स्पर फ्रेम असणाऱ्या या बाईकमध्ये 43 mm यूएसडी फोर्क आणि एक प्रीलोड-एडजस्टेबल मोनोशॉक युनिट देण्यात आलं आहे. 230 mm ग्राउंड क्लीयरन्ससह बाईकला 825 mm ची स्टॉक सीट देण्यात आली आहे. गरज भासल्यास ही सीट 845 mm पर्यंत वाढवता येऊ शकते किंवा  805 mm पर्यंत कमीसुद्धा करता येऊ शकते. या बाईकमध्ये राइड-बाय-वायर, नेव्हिगेशन, मीडिया कंट्रोल आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हीटीसोबत 4 इंच टीएफटी स्क्रीन,  राइड मोड (इको आणि परफॉर्मेंस) आणि स्विचेबल एबीएस देण्यात आलं आहे.