रेल्वे रिझर्व्हेशन फॉर्ममध्ये संपूर्ण नाव लिहिणे सक्तीचे

रेल्वे तिकीट रिझर्व्हेशन करताना त्या फॉर्मवर जर तुम्ही अर्धवट नाव लिहित असाल तर ती सवय तुम्हाला बदलावी लागे. कारण आता जर तुम्ही रिझर्व्हेशन फॉर्मवर अर्धवट नाव लिहिले तर तुमचे तिकीट रद्द केले जाऊ शकते. इतकेच नव्हे तर तुम्हाला दंडही भरावा लागेल. 

Updated: Jan 6, 2016, 01:35 PM IST
रेल्वे रिझर्व्हेशन फॉर्ममध्ये संपूर्ण नाव लिहिणे सक्तीचे title=

नवी दिल्ली : रेल्वे तिकीट रिझर्व्हेशन करताना त्या फॉर्मवर जर तुम्ही अर्धवट नाव लिहित असाल तर ती सवय तुम्हाला बदलावी लागे. कारण आता जर तुम्ही रिझर्व्हेशन फॉर्मवर अर्धवट नाव लिहिले तर तुमचे तिकीट रद्द केले जाऊ शकते. इतकेच नव्हे तर तुम्हाला दंडही भरावा लागेल. 

तिकीट दलाली करणाऱ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. संपूर्ण नाव लिहिलेले फॉर्मच स्वीकारावेत असेही रेल्वेने बुकिंग क्लार्कना सांगितलेय. 

तसेच प्रवासादरम्या त्या व्यक्तीने तिकीटासोबत ओळखपत्रही सोबत ठेवावे. रिझर्व्हेशन फॉर्ममध्ये अनेक व्यक्ती आपली नावे अर्धवट लिहितात. दोन तीन कॅरॅक्टर नावाच्या ठिकाणी भरुन फॉर्म दिले जातात. यामुळे दलाल व्यक्ती या अक्षरांशी मिळतेजुळते नावांच्या व्यक्तींकडून तिकीटाच्या बदल्यात अधिक पैसे उकळतात.