Argentina players celebration : अरे देवा...! सेलिब्रेशन करता करता मेस्सीचा पार्टनर पडला कचरा डबड्यात; पाहा Video

काल फ्रान्स विरूद्ध अर्जेंटीना यामध्ये फिफा वर्ल्डकपचा अंतिम सामना झाला, हा सामना अर्जेंटीनाने (Argentina) पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 ने जिंकला. अर्जेंटीना टीमचा ड्रेसिंग रूममधील सेलिब्रेशनचा व्हिडीओही व्हायरल झालाय. 

Updated: Dec 19, 2022, 11:09 PM IST
Argentina players celebration : अरे देवा...! सेलिब्रेशन करता करता मेस्सीचा पार्टनर पडला कचरा डबड्यात; पाहा Video title=

Argentina players celebration : एखाद्या महान खेळाडूकडे इतर कितीही ट्रॉफीस असतील मात्र, वर्ल्ड चॅम्पियन (World champion) बनवणारी ट्रॉफी नसेल तर काहीसं अपुरं वाटतं. असं काही अर्जेंटीनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीसोबत (Lionel Messi) झालं. फिफा वर्ल्डकपचा (FIFA World Cup) खिताब त्याच्याकडे नव्हता, मात्र अखेर त्याने तो पटकावलाच. काल फ्रान्स विरूद्ध अर्जेंटीना यामध्ये फिफा वर्ल्डकपचा अंतिम सामना झाला, हा सामना अर्जेंटीनाने (Argentina) पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 ने जिंकला. 

दरम्यान वर्ल्डकप जिंकल्यानंतर सेलिब्रेशन तर बनतचं. अर्जेंटीना टीमने देखील वर्ल्डकप जिंकल्यानंतर अगदी जोमाने सेलिब्रेशन केलं. अर्जेंटीना टीमचा ड्रेसिंग रूममधील सेलिब्रेशनचा व्हिडीओही व्हायरल झालाय. यामध्ये सेलिब्रेशनच्या नादात एक खेळाडू थेट कचऱ्याच्या डब्यात पडला आहे. 

अर्जेंटीना टीमच्या व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये, खेळाडू एकमेकांना पकडून ड्रेसिंग रूममध्ये धावताना दिसतायत. तर कर्णधार लिओनेल मेस्सी टेबलवर चढून आनंदाने डान्स करताना दिसतोय. यामध्ये सपोर्ट स्टाफमधील एक खेळाडू उडी मारण्याच्या नादात डायरेक्ट कचऱ्याच्या मोठ्या डब्यात पडल्याचंही दिसून येतंय. 

कसा रंगला फ्रान्स विरूद्ध अर्जेंटीनाचा सामना

अर्जेंटिनाकडून सामन्याच्या 23 व्या मिनिटाल मेस्सीने पेनल्टीवर गोल केला. त्यानंतर डी मारियाने 36 व्या मिनिटाला दुसरा गोल केला होता. पहिल्या हाल्पमध्ये अर्जेंटिनाकडे आघाडी होती. सामना पूर्णपणे अर्जेंटिनाच्या पारड्यात झुकला होता. दुसऱ्या हाल्फच्या शेवटाला पेनल्टी मिळाल्यावर फ्रान्सच्या एम्बाप्पेने 80 व्या मिनिटाला पहिला आणि 81 व्या मिनिटाला दुसरा गोल करत सामन्यात पुन्हा रंगत आणली. 

90 मिनिटांमध्ये सामना  2-2 च्या बरोबरीत सुटला, त्यानंतर 30 मिनिटांचा एक्सट्रा टाईम देण्यात आला. मेस्सीने पुन्हा एकदा आपली जादू दाखवली आणि 108 व्या मिनिटाला गोल केला. सामन्यात आघाडी घेतली. सर्व हताश झाले होते कारण सामना जवळपास फ्रान्सने जिंकला होता मात्र तितक्यात हँड झाला आणि एम्बाप्पेने तिसरा गोल करत सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने 4-2 असा विजय मिळवला. 

विजयानंतर लियोनेल मेस्सीची भावूक पोस्ट

"वर्ल्ड चॅम्पियन्स! मी खूप वेळा हे स्वप्न पाहिले, मला त्या स्वप्नानं झपाटलं होतं. माझा अजूनही विश्वास बसत नाही. माझ्या कुटुंबाचे, मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो. आम्ही पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की, साध्य करण्यास आम्ही सक्षम आहोत. हा  वैयक्तिक म्हणण्यापेक्षा संघाचा विजय आहे. ते सर्व अर्जेंटिनांचे स्वप्न होते... आम्ही ते केले!  आम्ही लवकरच एकमेकांना भेटणार आहोत.", अशी इन्स्टाग्राम पोस्ट लियोनेल मेस्सीनं लिहिली आहे.