एमएस धोनी असं का वागला? RCB च्या खेळाडूंबरोबर हात न मिळवताच निघून गेला... Video व्हायरल

IPL 2024 : 18 मे रोजी झालेल्या चुरशीच्या सामन्यात बंगळुरुने चेन्नईचा पराभव करत प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. या सामन्यानंतर बंगळुरुच्या खेळाडूंनी मैदानावर जोरदार जल्लोष केला. पण यादरम्यान एक घटना घडली ज्यावरुन वाद निर्माण झाला आहे. 

राजीव कासले | Updated: May 20, 2024, 11:21 AM IST
एमएस धोनी असं का वागला? RCB च्या खेळाडूंबरोबर हात न मिळवताच निघून गेला... Video व्हायरल title=

IPL 2024 :  आयपीएलच्या सतराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सला  (Chennai Super Kings) प्ले ऑफमध्ये (Play Off) प्रवेश करण्यास अपयशी ठरली. 18 मे रोजी झालेल्या करो या मरोच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात पराभव केला. या विजयानंतर बंगळुरुच्या खेळाडूंनी मैदानावर एकच जल्लोष सुरु केला. इतकच काय तर त्यांनी प्रेक्षकांना अभिवादन करत चिन्नास्वामी मैदानावर एक फेरीही मारली. तर दुसरीकडे चेन्नईच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. यादरम्यान सोशल मीडियावर महेंद्रिसंग धोनी (Mahendra Singh Dhoni) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या सामन्यानंतर धोनी बंगळुरुच्या खेळाडूंबरोबर हात न मिळवताच मैदानावरुन निघून गेल्याचा दावा करण्यात येतोय. शांत स्वभावाचा धोनी असं का वागला यावर आता उलट सुलट चर्चा सुरु झालीय.

काय आहे व्हायरल व्हिडिओत
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत सामना संपल्यानतंर चेन्नई सुपर किंग्सचे खेळाडू लाईनमध्ये उभे असलेले दिसतायत. या लाईनमध्ये एमएस धोनी सर्वात पुढे उभा असलेला दिसतोय. पण बंगळुरुच्या खेळाडूंशी हात न मिळवताच तो मैदानावर निघून गेला. धोनीच्या या असल्या वागण्यावर चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय. पण आता धोनी नेमकं असं का वागला याचं सत्य समोर आलं आहे. 

वास्तविक चेन्नईचे सर्व खेळाडू बंगळुरुच्या खेळाडूंशी हात मिळवण्यासाठी लाईनमध्ये उभे होते. पण बंगळुरुचे खेळाडू जल्लोषात सर्व विसरुन गेले होते. चेन्नईच्या खेळाडूंनी बराच वेळ त्यांची वाट पाहिली. पण बंगळुरुच्या खेळाडू्ंनी त्यांच्याकडे पाहिलं ही नाही. त्यामुळे काही वेळाने धोनी ड्रेसिंग रुमकडे निघून गेला. बाऊंड्रीवर असलेल्या बंगळरुच्या खेळाडूंबरोबर आणि सपोर्ट स्टाफबरोबर हात मिळवत धोनी निघून जाताना दिसतोय.

मायकेल वॉनने बंगळुरुला सुनावलं
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवरुन वाद सुरु असतानाच आता इंग्लंडचा माजी दिग्गज खेळाडू मायकल वॉनने बंगळुरुच्या खेळाडूंच्या वर्तणूकीवर चांगलंच सुनावलं आहे. बंगळुरुच्या खेळाडूंनी जल्लोष करण्याआधी विरोधी संघाच्या खेळाडूंबरोबर हातमिळवणी करायला हवं होतं, त्यानंतर त्यांनी जल्लोष करावा असं वॉनने म्हटलं आहे. धोनी एक लिजेंड खेळाडू आहे. निदान तो मैदानावर असताना बंगळुरुच्या खेळाडूंनी भान बाळगाला हवं होतं, असंही वॉनने म्हटंलय.

धोनीचा आयपीएल हंगाम
महेंद्रिसिंग धोनी आयपीएलच्या या हंगामात 14 सामने खळला. यात त्याने 161 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट 220.55 इतका होता. धोनीचा हा आयपीएलचा शेवटचा हंगाम असल्याची चर्चा आहे. इतकंच काय तर धोनी पुढच्या हंगामात खेळला तरी यलो जर्सीत दिसणार नाही असा कयासही लगावला जातोय.