आश्चर्यकारक Adventure! तो 165 वर्षे जुन्या बोगद्यात घुसला अन् मग...धक्कादायक Video Viral

Viral Video :  सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती 165 वर्षे जुन्या बोगद्यात घुसला आणि अडकल्या त्यानंतर काय झालं पाहा. 

नेहा चौधरी | Updated: May 13, 2024, 09:23 AM IST
आश्चर्यकारक Adventure! तो 165 वर्षे जुन्या बोगद्यात घुसला अन् मग...धक्कादायक Video Viral  title=
Amazing Adventure manEntered 165 years old tunnel and then Shocking Video Viral instagram trending now

Trending Video : साहसच्या नावाखाली लोक कोणतेही धोकादायक कृत्य करताना आपण पाहिलं आहे. अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील एका व्यक्तीचा मुर्खपणा त्याला नडला. Adventure च्या नावाखाली त्याने अरुंद अशा 165 वर्षे जुन्या बोगद्यात घुसला. पण त्यानंतर तो तिथे अडकला. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडिओला इंस्टाग्रामवर आतापर्यंत 66 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून हजारो लोकांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट केल्या आहेत. (Amazing Adventure manEntered 165 years old tunnel and then Shocking Video Viral instagram trending now)

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती एका अरुंद लहानच्या बोगद्यात मोबाईलचा कॅमेरा सुरु करुन आत शिरतो. हळू हळू तो खोल आत शिरत जात असताना तो बोगद्या अजून अरुंद होत जातो. हे दृश्य पाहून आपल्या अंगाला काटा येतो. पण हा व्यक्ती जराही न घाबरता पुढे पुढे जात राहतो. जीव धोक्यात घालून हा व्यक्ती साहसी कृत्य करताना दिसत आहे. 

अंडर ग्राउंड बर्मिंगहॅम नावाच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट हा व्हिडीओ शेअर करण्यात आल्यानंतर तो इंटरनेटवर तुफान व्हायरल होतो आहे. जेव्हा तो व्यक्ती आत शिरत जातो तेव्हा तो एका भिंतीजवळ पोहोचतो. ती एक टाकी असल्याचा दिसतं. हो बोगदा खूप जुन्या कोळशाच्या खाणीचा एक भाग आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिल्यात की सुमारे 165 वर्षे जुने असून तो 1860 मध्ये बांधण्यात आलाय. 

या व्हिडीओमधील व्यक्ती या बोगद्यातून बाहेर पडला का? या अरुंद बोगद्यातून कशापद्धतीने बाहेर आला हे काही समजलेलं नाही. एका यूजरने म्हटलंय की, 'तुम्ही हे कसं करता मला माहिती नाही, पण हे पाहून मी अस्वस्थ झालोय.'