अर्ध्या तिकीटात रेल्वे प्रवास करायचा असेल तर रेल्वेच्या या अटी पूर्ण करा

भारतीय रेल्वेतर्फे प्रवाशांसाठी भाडे दरात देण्यात येणारी सुट आणि अर्ध्या तिकीटात प्रवास करायचा असेल तर रेल्वेच्या काही अटी पूर्ण केल्यानंतर तो मिळेल. 

Updated: Jun 15, 2016, 05:25 PM IST
अर्ध्या तिकीटात रेल्वे प्रवास करायचा असेल तर रेल्वेच्या या अटी पूर्ण करा title=

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेतर्फे प्रवाशांसाठी भाडे दरात देण्यात येणारी सुट आणि अर्ध्या तिकीटात प्रवास करायचा असेल तर रेल्वेच्या काही अटी पूर्ण केल्यानंतर तो मिळेल. 

आपण महिला असाल तर ५८ वर्षे वयाच्या महिलांना वरिष्ठ नागरिकाची श्रेणी प्राप्त होते. त्यापेक्षा कमी वयाच्या महिलांना नाही. वरिष्ठ महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के सूट मिळते. मात्र, लक्षात ठेवा केवळ मूळ भाड्यात ४० टक्के आहे.

रेल्वेने वरिष्ठ नागरिकांसाठी अर्थात पुरुषांसाठी ६० वर्षे आहे. आपण ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असाल तर वरिष्ठ श्रेणीत आपण मोडले जाता. त्यामुळे रेल्वेच्या भाड्यात ४० टक्के सूट मिळते.

आरक्षण तिकिटासाठी ही सवलत हवी असल्यास तसे आरक्षण मागणी अर्जात मागणी असावी. त्यासाठी शासकीय संस्था, एजन्सी, स्थानिक संस्थाने जारी करणे आवश्यक आहे. ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, शैक्षणिक प्रमाणपत्रे, पंचायत, महापालिका, नगरनिगम यांनी जारी केलेले प्रमाणपत्र तसेच अन्य काही विश्वसनीय मान्यताप्राप्त दस्ताऐवज असावा.

वरिष्ठ नागरिकांना तिकीट दिल्यानंतर रेल्वे प्रवास करताना आपल्या वयाचा दाखला किंवा जन्म तारीख संबंधीत कोणतेही ओळखपत्र किंवा दस्ताऐवज दाखवला पाहिजे. तसेच तुम्ही आजारी आहात आणि प्रवास करताना तुमच्यासोबत डॉक्टरही प्रवास करीत असेल तसा उल्लेख तुम्ही तुमच्या आरक्षण अर्जात केला पाहिजे.