World Cup : इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट कोहलीचा मोठा खुलासा, ''मी 8-9 वर्षांपासून आजारी...''

Virat Kohli in ODI WC 2023 : वर्ल्डकप पाँईंट्स टेबलमध्ये भारत सध्या अव्वल स्थानावर आहे. रविवारी 29 ऑक्टोबरला इंग्लंड विरुद्ध भारत सामना रंगणार आहे. त्यापूर्वी विराट कोहलीने मोठा खुलासा केला आहे.   

नेहा चौधरी | Updated: Oct 26, 2023, 05:07 PM IST
World Cup : इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट कोहलीचा मोठा खुलासा, ''मी 8-9 वर्षांपासून आजारी...'' title=
world cup Virat Kohli big revelation before the match against England I have been sick for 8 9 years my mother thinks that reveals in an interview

Virat Kohli in ODI WC 2023 : भारताच्या यजमानपदात विश्वचषक 2023 सामने रंगदार वळणावर येऊन ठेवला आहे. 30 तारखेपर्यंत सेमीफायनलमध्ये कुठला संघ जाणार हे चित्र स्पष्ट होईल. वर्ल्डकपमधील आतापर्यंतची भारताची कामगिरी उत्तम असून पाँईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. येत्या रविवारी म्हणजे 29 ऑक्टोबरला भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. त्यापूर्वी भारताचा स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार विराट कोहलीने मोठा खुलासा केला आहे. विश्वचषकात चमकदार कामगिरी करणारा विराट लखनऊमध्ये होणाऱ्या सामन्यासाठी सज्ज होत असताना त्याने आपल्या आजारपणाबद्दल भाष्य केलं आहे. विराटची गणना जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये होते. त्याच्या नावावर एकशे एक रेकॉर्ड आहेत. त्याचा फिटनेसचीही अनेक वेळा तारीफ होते.(world cup Virat Kohli big revelation before the match against England I have been sick for 8 9 years my mother thinks that reveals in an interview)

''मी 8-9 वर्षांपासून आजारी...''

खरं तर इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी विराट कोहलीने एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे. आईप्रती प्रेम व्यक्त करताना विराट म्हणाला की, ''माझ्या आईची काळजी घेणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तिचा आनंदच माझ्यासाठी सर्वस्व आहे. माझ्या विजय हा तिचा आनंद असतो आणि तो छोटासा विजय देणे मला आनंद देतो. ''

तो पुढे असं म्हणाला की, ''माझ्या आईला असं वाटतं की, मी गेल्या 8-9 वर्षांपासून आजारी आहे. पण मी तिला हे सांगत नाही की मी माझ्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केलं आहे. माझी आई मला रोज फोन करते आणि खाण्यापिण्याबद्दल विचारते. ती कायम म्हणते मी अशक्त दिसतोय, पण तिचा आशिर्वाद माझ्यासोबत आहे.'' 

विराट कोहली विश्वचषकात चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तो म्हणतो मी माझं ध्येय नेहमीच चांगले होण्याचं आहे, उत्कृष्टतेच्या मागे धावण्याचा नाही. कोहली सध्या विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने पाच सामन्यांमध्ये 118.00 च्या सरासरीने 354 धावा केल्या आहेत.  विश्वचषकात एक शतक आणि तीन अर्धशतक विराटच्या नावावर आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

कोहली म्हणाला, ''मी प्रत्येक दिवस, प्रत्येक सराव सत्र, प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक हंगामात स्वतःला कसं सुधारता येईल यावर मी नेहमीच काम केलंय. यामुळेच मला इतकं दिवस खेळण्यात आणि कामगिरी करण्यात मदत होते आहे.''